निंभोरा। येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थिनी महिमा चौधरी हिला दहावी बोर्डाच्या परीक्षेत 91.80 टक्के मिळून प्रथम क्रमांक मिळविला तसेच द्वितीय क्रमांक आचल बोरोले 87.40 टक्के, तृतीय क्रमांक भुवनेश्वरी बर्हाटे 86.60टक्के, चौथा क्रमांक पूर्वा पाटील 86.40 टक्के, पाचवा क्रमांक मेघा भोलणकर 84.40 टक्के या सर्व विद्यार्थिनीचे निंभोरा गावात कौतुक होत आहे. तसेच महिमा चौधरी या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आल्याने तिच्या परिवाराकडून, वडिलांच्या मित्रपरिवाराकडून सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
त्यावेळेस मनोज सोनार, सरफराज खान, चेतन चौधरी, सुर्यकांत चौधरी, प्रकाश चौधरी व परिवारातील महिला सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्वांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.