मुंबई/पुणे : स्मार्टफोन, टॅबलेटस् आणि इतर मोबाईल उपकरणांवर अश्लील व्हिडिओ (पॉर्न क्लिप) पाहण्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. जागतिकस्तरावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली. जगभरातील 72 टक्के स्मार्टफोन्स व इतर छोट्या उपकरणांद्वारे अश्लील व्हिडिओ पाहिले जातात. पॉर्नहब या संकेतस्थळाद्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, असे व्हिडिओ पाहणार्या पुरुषांच्या संख्येपेक्षा महिलांची संख्या ही 16 टक्क्याने जास्त आहे. भारतातदेखील पॉर्न पाहणार्या आंबटशौकिन महिलांची संख्या जास्त असल्याची माहिती या संकेतस्थळाद्वारे देण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे, अश्लील व्हिडिओ पाहण्यात पुणे, मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमधील महिलांची संख्याही मोठी असल्याची माहिती पुढे आली आहे. हे व्हिडिओ पाहण्यात विवाहित महिलांसह तरुणी व महाविद्यालयीन युवतीसह किशोरवयीन मुलींचाही मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.
विदेशात वाढत्या वयात लागली अधिक चटक!
असे समजले जाते, की अश्लील व्हिडिओ ज्याला आपण पॉर्न व्हिडिओ म्हणतो ते पाहण्यात पुरुषांची मोठी संख्या असते. त्यांना आंबटशौकिन असे म्हटले जाते. परंतु, पॉर्नहब या संकेतस्थळाने जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महिलाही पुरुषांच्या तुलनेत कमी नसून, त्याही चांगल्याच आंबटशौकिन झाल्याचे दिसून आले आहे. एकूण स्मार्टफोन व इतर उपकरणांपैकी 72 टक्के उपकरणांवर अश्लील व्हिडिओ पाहिले जात आहेत. त्यात 16 टक्क्यांनी पुरुषांपेक्षाअधिक महिलांचा समावेश दिसून आला. पॉर्नहबच्या म्हणण्यानुसार, वाढत्या वयानुसार अश्लील व्हिडिओ पाहण्याची संख्याही वाढत जात आहे. 55 वर्षांपेक्षाअधिक वयाच्या महिला पुरुषांपेक्षा 40 टक्क्यांनी जादा अश्लील व्हिडिओ पाहताना आढळून आल्यात. तर 65 पेक्षा जास्त वयाच्या महिला या 66 टक्क्यांनी जास्त आंबटशौकिन आढळून आल्यात. त्यामुळे एखाद्या आजीकडे स्मार्टफोन असेल तर विदेशात त्या आजीकडेही आता संशयाने पाहिले जाऊ लागले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणींमध्ये आंबटशौकिनपणा!
पुणे, मुंबई किंवा पिंपरी-चिंचवडचा विचार करता, अश्लील व्हिडिओ पाहण्यात किशोरवयीन युवती व तरुणींची संख्या जास्त आहे. 17 ते 27 वयोगटातील तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण दिसून आले आहे. या शहरांत शिक्षण, करिअर किंवा नोकरीसाठी आलेल्या युवतींची संख्या जास्त आहे. यापैकी बहुतांश युवती फावल्या वेळात आपल्या स्मार्टफोनवर पॉर्न क्लिप पाहात असल्याचे दिसून आले आहे. सेक्सबाबत पूर्वीइतकी गोपनीयता राहिली नसून, युवती याबाबत अधिकच पुढारलेल्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात आंबटशौकिनपणा वाढल्याचे या अहवालावरून दिसून आले आहे. अर्थात कुणी काय पाहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी, त्यातून महिलांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आता बदल झाल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे.