महिलांची अंर्तवस्त्रे पाठवून जामनेरच्या व्यावसायीकाला मनस्ताप

जामनेर : एका व्यावसायीकाला त्रास देण्याच्या हेतूने अज्ञाताने बनावट ई मेलद्वारे ऑनलाईन शॉपींगद्वारे महिलांची अंर्तवस्त्रे पाठवल्याची बाब उघड झाली आहे शिवाय अनेकदा हा प्रकार घडल्यानंतर जळगाव सायबर पोलिसात या प्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑर्डर दिली नसतानाही आले पार्सल
जामनेर येथील 35 वर्षाच्या तररुण व्यावसायिकाच्या घरी ऑनलाईन शॉपींग पोर्टलवरून एक पार्सल आले. ऑर्डर दिली नसतांनाही हे पार्सल आल्याने तो चक्रावून गेला मात्र हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने पार्सल रीसीव्ह केले. यात महिलांचे अंतर्वस्त्र निघाले. यानंतर अनेक शॉपींग पोर्टल्सवरून अशाच प्रकारचे पार्सल्स येऊ लागल्याने त्या तरूणाला मोठा मानसिक त्रास झाला. 6 जूनपासून सुरू झालेला हा प्रकार अनेक दिवसांपर्यंत सुरू राहिला. या प्रकरणी शेवटी संबंधीत तरूणाने जळगाव सायबर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या संदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे खोडसाळपणा करणार्‍याने तक्रारदार तरुणाचा बनावट ई-मेल तयार करून त्यावरून या व्यावसायीकाच्या पत्त्यावर ऑर्डर दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस स्थानकाचे निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.