आमदार सुरेश गोरे : डॉ. आंबडकर बचत गटाचा सत्कार
चाकण । आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्रय रेषेखालील महिलांना एकत्रित करून पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाने सबसिडी दिलेल्या भांडवलावर व बँक कर्जाच्या माध्यमातून उभारलेल्या व्यवसायामुळे महिलांची झालेली आर्थिक प्रगती अतिशय उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार आमदार सुरेश गोरे यांनी काढले.
खेड तालुक्यातून प्रथम व जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवित राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार मिळवणार्या कडूस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचा आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा जाई भालेराव, अंजना देशनेहेरे, संगिता देशनेहेरे, वनिता लांडगे, शांताबाई कडलग, नुतन गवारी, मंगला वाघमारे आदी सदस्यांसह बौद्धजन सहाय्यक संघ, प्रकाश देशनेहेरे, भाऊसाहेब गायकवाड, राघव कडलग, अनिल कडलग व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. संचित देशनेहेरे या विद्यार्थ्याने इंग्रजी अध्ययनात खेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचाही यावेळी आमदार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.