महिलांची छेड काढणार्‍यावर कारवाई होऊन महिलांना संरक्षण मिळावे

0

चाळीसगाव । चाळीसगाव शहरात मुली आणि महिलांची छेडछाड करण्याच्या प्रकरणात वाढ होऊन महिला आणि मुली कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. त्यांना संरक्षण मिळावे व अश्यावर कारवाई करावी तसेच पोलिसांतर्फे निर्भया पथकाची पुन्हा नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्याकडे विविध संघटना, नागरिक व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावर महिला पोलिस कर्मचार्‍यांची शाळा व महाविद्यालयाच्या ठिकाणी गस्त वाढविणार असल्याची माहीती अपर पोलीस अधिक्षक बच्छाव यांनी सांगितले.

खासगी शिकवणीला जाणार्‍या विद्यार्थींना रस्त्यावर छेडछानी
चाळीसगाव शहरात काही दिवसांपासून महिला व मुलींच्या छेडछाड प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, बसप्रवासात मुलींची छेडछाड होत असतांना दिसून येते. तर काही विद्यार्थीनी खासगी शिकवण्यांसाठी पहाटे व सायंकाळी रस्त्याने जात येत असतांना काही टवाळखोर तरून त्यांच्या जवळून मोटारसायकल घेऊन जात रस्त्यावर गाड्या आडव्या लावतात. त्यांना हातवारे करून शेरेबाजी करतात, यामुळे मुलींना रस्त्यावरून जाणे देखील कठीण झाले आहे. शहरात अवैध धंद व गुन्हेगरीच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या अपवृत्तींना पाठबळ मिळत आहे. यावर खाकीचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित करून अवैध धंदे आणि टवाळखोटीवर आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे.

महाविद्यालयात ओळखपत्र सक्तीची मागणी
त्याप्रमाणे महाविद्यालयामध्ये टवाळखोर मुले थेट वर्गात जातात. त्यामुळे विद्यार्थी व टवाळखोर कोण हे ओळखणे देखील कठीण होते. महाविद्यालयाच्या आवारात असे प्रकार होत असल्याने महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थी व विद्यार्थीनींना ओळखपत्र असेल ते विद्यार्थी व नसेल ते टवाळखोर असे ओळखण्यास मदत होईल. तसेच महाविद्यालयात विद्यार्थी शिस्त संरक्षण समिती कार्यरत नसल्याने असे प्रकार वाढत आहे. यावेळी उपस्थित संघटनेच्या पदाधिकारी, नागरिक व महिला यांनी नाराजी व्यक्त केली.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्‍या
प्रफुल्ल साळुंखे, कावेरी पाटील, सोनल पाटील, रयतसेनेचे गणेश पवार, खुशाल मराठे, गोरख साळुंखे, भागवत पाटील, मंगेश साळुंखे, गुणवंत साळुंखे, राहुल वाकलकर, सचिन पवार, भाऊसाहेब सोमवंशी, दिपक साळुंखे, विनोद चव्हाण, विकास महाजन, जितेंद्र साळुंखे, सागर साळुंखे, कल्पेश महाले, सुजित पाटील, निलेश पवार, अतुल साळुंखे, हर्षल साळुंखे, विवेक साळुंखे, ऋषीकेश राखुंडे, निलेश वाघ, योगेश चव्हाण, विवेक वाघ, हर्षल जोशी, अमोल पवार, ऋषीकेश देशमुख, समाधान अहिरे, सुदाम राठोड, विशाल चौधरी, विरेंद्रसिंग सुर्यवंशी, सुनिल माळी, पुरूषोत्तम सोनवणे, भाऊसाहेब साळुंखे, सागर निकम आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.