महिलांची मुलभूत सुविधांसाठी महापौरांकडे धाव

0

जळगाव। शहरातील आएमएस कॉलनीतील गट नं. 99 मधील विविध समस्यांचे निवेदन महापौर नितीन लढ्ढा यांना कॉलनीतील महिलांनी दिले. यावेळ महापौरांशी चर्चा करतांना महिलांनी त्यांना भेडसावणार्‍या गटार, पाणी,वीज, रस्त्यांच्या प्रश्‍नावर चर्चा केली. ठराविक भागात विद्युत पोल असल्याची तक्रार या महिलांनी महापौरांकडे केली. विद्युत अभियंता एस. एस. पाटील यांनी विद्युत पोलचा विषय हा महावितरणाचा विषय असल्याने त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. या भागातील खुल्या भूखंडात विहीर असून ती उघडी असल्याने तेथे जिवीत हानी होण्याची शक्यता या महिलांनी व्यक्त केली. निवेदन देतांना 30 ते 35 महिला हजर होत्या.

बुधवारी पाहणी करण्याचे महापौरांचे आश्‍वासन
नियमित करांचा भरणा करूनही आम्हाला सुविधा दिली जात नसल्याची कैफयीत महापौरांकडे या महिलांनी मांडली. महापौर लढ्ढा यांनी अमृत योजनेचे काम न्यायालयीन प्रक्रीयेत असल्याचे या शिष्टमंडळाला सांगितले. अमृत योजनेची कामे शहरात प्रस्तावित असल्याने रस्ते, गटारी, पाणी यांची कामे करता येणार नाही असे स्पष्ट केले. महिलांना तात्पुरती सुविधा करून देण्याचा आग्रह महापौरांकडे केला. महापौर लढ्ढा यांनी शहर अभियंता सुनिल भोळ, पाणी पुरवठा अधिकारी डी. एस. खडके व विद्युत अभियंता एस. एस. पाटील व आरोग्य निरीक्षकांसोबत बुधवारी पहाणी करतील असे आश्‍वासन दिले. महिलांनी कच्चा रस्ता तयार करण्याची मागणी केली.

रस्ते ही खराब
पाईप लाईन नसल्याने उघड्यावर असलेल्या विहीरीचे पाणी प्यावे लागत असल्याची समस्या मांडली. या सर्व समस्या समजण्यासाठी महापौरांनी स्वतः 5 मिनीट प्रत्यक्ष भेट द्यावी अशी मागणी केली. रस्ते, गटारी नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रस्ते नसल्याने पाठीचे दुखणे सुरू झाली असल्याचे या महिलांनी तक्रार केली. खुल्या भुखंडात मोठ मोठे गवत तयार झाले असून तेथे साप, विंचू आदी असण्याची शक्यता व्यक्त करत खुल्या भुखंडातील गवत कापण्याची मागणी केली.