शेंदुर्णी। दुःखात, वेदनेत जीवन जगणार्या स्त्री वर्गाला पिढ्यानपीढ्या दुय्यम स्थान देण्यात आले आहे. येणार्या काळात माहिला रोजगार क्षम बनल्या तरच देश स्पधेच्या युगात टिकू शकेल. त्यासाठी महिला सक्षमीकरण गरजेचे असून समाजाने आद्य कर्तव्य समजुन महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन द्यी.शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांनी केले.
28 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान कार्यशाळा
आ.र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित उत्तर महाराष्ट्र स्तरीय लिंग समभाव कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई स्थित माहिम मेन्स अगेन्स्ट व्हॉयलन्स अँड अॅब्यूज (मावा) या अशासकीय स्वयंसेवी संस्थेच्या विद्यमाने 28 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हयातील निवड करण्यात आलेल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील यांनी जेंडर सेन्सेटीव्हीटी या विषयाची गरज विषद केली. कोपर्डी, निर्भया सारख्या घटनामुळे स्त्री वर्गात असुरक्षितता निर्माण झाली असून वर्किग विमेन्सचे प्रमाण त्यामुळे घटत आहे. याज्वलंत समस्येकडे समाजाचे चित्त वेधण्याचे काम कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी येणार्या काळात करतील असे प्रतिपादन केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा एन.एन.सावळे, प्रा.डॉ. शाम साळुखे , प्रा.सुजाता पाटील,डॉ.आर.डी.गवारे, प्रा.दिनेश पाटील, प्रा.योगिता चौधरी, प्रा.संजय पाटील, प्रा.वर्षा लोखंडे, प्रा.रिना पाटील उपस्थित होते. यशस्विततेसाठी सचिन लोहार, आकाश सूर्यवंशी, सतीष पाटील, बशरत तडवी यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रा.भूषण पाटील तर आभार डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.