रस्त्याने जाणा-या नागरिक, तरुण, तरुणी आणि महिलांच्या अंगावर जाणीवपूर्वक विनाकारण रंग अथवा रंगाचे फुगे टाकणा-या तरुणांवर वाकड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 84 जणांवर कारवाई करण्यात आली आहे..
सार्वजनिक रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये थांबून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर रंगाचे फुगे टाकणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिले.
त्यानुसार वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण नऊ पथके तैनात करण्यात आली. त्यामध्ये 75 पोलीस कर्मचारी सहभागी झाले. पोलिसांनी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळवडीच्या रंगाचा बेरंग करणा-या 84 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.