पुणे । सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला घरचा व्याप सांभाळून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवून आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असून अशा महिलांना आपले कौशल्य जगाबाहेर पोहचविण्यासाठी महापालिकेतर्फे ’स्माईल’ ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या संस्थेत सहभाग घेऊन आपले कर्तृत्व जगाच्या कानाकोपर्यापर्यंत सिद्ध करावे, असा सल्ला खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी दिला.
समाजीतील गरजू, वंचित रुग्णांना पैशाअभावी डायलेसिसिचा खर्च पेलावरणारा नसतो. हा उपचार मोफत व्हावा, या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागतर्फे ओसवाल भवन येथे महिलांनी स्वतः बनविलेल्या हस्तकला वस्तू प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अॅड. चव्हाण बोलत होत्या. यावेळी क्लबचे मार्गदर्शक फत्तेचंद रांका, अध्यक्ष चंद्रकांत चमाडीया, सुनीता चमाडीया, जनसंपर्क अधिकारी आशा ओसवाल, क्लबच्या सदस्या चैताली पटनी, पल्लवी शहा, दिपा गांधी आदी उपस्थित होते. लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, रवींद्र सातपुते आदी मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
प्रदर्शनातील वस्तूंची पाहणी
प्रदर्शनात जवळपास 150 स्टॉल्स उभारण्यात आले असून यामध्ये घरातील सुशोभित वस्तुंपासून ते कपडे, हाताने बनविलेले कलाप्रकार, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचा समावेश आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर अॅड. चव्हाण यांनी प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूंची पाहणी केली. तर अशा महिलांच्या कायम पाठीशी राहू, असे आश्वासन दिले. तर क्लबच्या माध्यमातून गरीब आणि गरजुंना मोफत मिळावा या हेतूने सुरू असणार्या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. गेल्या पाच वर्षांपासून लायन्स क्लब पुणे हा उपक्रम राबवित असल्याचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.