बोदवड- राज्य महिला आयोग, मुंबई प्रायोजित आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र 13 रोजी महाविद्यालयात होत आहे. चर्चासत्रात ‘ग्रामीण महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा जनजागृती’ या विषयार चर्चा केली जाणार असून उद्घाटन जामनेर नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे असतील..
यांची राहणार प्रमुख उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परीषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती रजनी चव्हाण, राज्य महिला आयोगाचे जिल्हा सचिव अॅड.पियुष गढे, बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मुमताज बी.सईद बागवान, बोदवड सार्वजनिक को.ऑप.सोसायटीचे अध्यक्षमिठूलाल अग्रवाल असतील.
दिवसभर पाच सत्रात चालणार चर्चासत्र
दिवसभर चालणार्या या चर्चासत्रात ग्रामीण भागातील महिला, त्यांचे आरोग्य व त्यांची आरोग्य व त्यांची सुरक्षा याबाबत कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करणेसाठी प्रथम सत्रात सकाळी 10.30 वाजता जळगाव येथील जिल्हा न्यायालयाच्या अॅड.मंजु वाणी यांचे ‘हिंदू वारसा हक्क व कायदा 1954’ या विषयावर व्याख्यान होईल. सत्राध्यक्ष म्हणून बोदवड येथील ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गड्डम असतील. दुसर्या सत्रात सकाळी 11.45 वाजता महिला शारीरिक आजार या विषयावर बोदवड येथील गुरुदेव रुग्णालयाच्या डॉ.वृषाली चौधरी या मार्गदर्शन करतील तर सत्राध्यक्ष म्हणून पाचोरा येथील डॉ.अनुजा देशमुख या सत्राध्यक्ष असतील. चर्चासत्राच्या तिसर्या सत्रात दुपारी 2.00 वाजता ‘महिलांचे मानसिक आजार, लक्षणे आणि उपाय योजना’
या विषयावर जळगाव येथील भक्ती मानसोपचार केंद्राच्या प्रमुख डॉ.कीर्ती देशमुख या मार्गदर्शन करतील. सत्राध्यक्ष म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक येथील डॉ.संगीता महाजन या असतील. चौथ्या सत्रात दुपारी 3.15 वाजता महिला विषयक विविध कायद्यांचा आढावा प्रा.डॉ.रुपाली तायडे या आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शनपर माहिती देतील. सत्राध्यक्ष म्हणून महिला आयोगाचे जिल्हा सचिव अॅड. पियुष गढे हे असतील. पाचव्या सत्रात दुपारी 4.30 वाजता प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवसभर झालेल्या विविध व्याख्यानांच्या संदर्भात व महिलांच्या समस्या संदर्भात खुल्या चर्चेचे आयोजन असेल.
यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचा समारोप
राज्यस्तरीय चर्चासत्राचा समारोप समारंभ सायंकाळी 5.00 वाजता बोदवड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर.ओ.वाघ यांचे अध्यक्षतेखाली तसेच बोदवड सार्व.को.ऑप.सोसायटीचे उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. राज्यस्तरीय चर्चासत्रासाठी प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. बोदवड महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्रात महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवावा व चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा, प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी, उपप्राचार्य देवसिंग पाटील, चर्चासत्र सचिव डॉ.गीता पाटील यांनी केले आहे.