हडपसर : ससाणेनगर येथील नवनाथ तरुण मंडळाच्यावतीने 71 व्या स्वातंत्र दिनानिमित्त महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गेल्या वर्षीपासून हा उपक्रम राबवत आहे. नवनाथ तरुण मंडळ यंदा 37 वा गणेशोत्सव साजरा करत आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आपल्या भारताच्या घटनेला अभिप्रेत महिला हक्क यावर मंडळाने कृतिशील कार्यक्रम केला, असे प्रतिपादन हडपसर-मुंढवा प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक योगेश ससाणे यांनी केले.
मंडळाचे सर्व पदाधिकारी व नवनाथ तरुण मंडळाच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. नवनाथ ट्रस्टतर्फे शिवाजी जाधव, चैतन्य काळे, हिरामण वाडकर, बाळासाहेब मोरे, सुशील जाधव, अजिंक्य ससाणे, मिलिंद वाडकर, अनिल तावरे, मुकेश वाडकर, शुभम जाधव, भारत गायकवाड, ऋषिकेश जाधव, शुभम जाधव, विशाल माने, स्नेहा वाडकर, अर्चना माकर, मंदाकिनी वाडकर, स्वाती शिंदे, प्रियांका वाडकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.