जागतिक महिला दिना निमित्त इंदापूरात कायदेविषयक शिबीर संपन्न
इंदापूर : महिलांना असणारा मालमत्तेचा अधिकार व त्याची अमलबजावणी हिंदू वारसा कायदा 2005 मधील कलम 6 प्रमाणे वाटपामध्ये वडील व मुलाइतकेच समान हक्क महिलांना कायद्याने दिलेले असल्याचे इंदापूर येथिल सह दिवाणी न्यायाधिश एस.बी.यादव यांनी इंदापूर पंचायत समीती लोकनेते शंकरराव पाटील सभाग्रहात अध्यक्षिय भाषणात बोलताना सांगीतले.
जागतिक महिला दिनानिमित्त इंदापूर तालुका विधी सेवा समिती व इंदापूर तालुका वकिल संघटना यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर पंचायत समिती येथिल लोकनेते शंकरराव पाटील सभाग्रहात आयोजीत महिला दिन कायदेविषयक शिबीर आयोजीत करण्यात आले होते.यावेळी इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश अ.अ.शेख, सह दिवाणी न्यायाधिश एस.बी.यादव,सहदिवाणी न्यायाधीश एन.ए.शेख, पंचायत समिती गटविकास अधिकारी मानिकराव बिचकुले हे प्रमुख पाहूणे म्हणून ऊपस्थित होते.तर इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष मधूकर ताटे,उपाध्यक्ष अश्पाक सय्यद,सचिव किरण लोंढे,बापू साबळे, माजी उपाध्यक्ष अँड.रूषिकेश कोथमिरे, महिला प्रतिनिधी जुई नवले- झणझणे,महिला सदस्या जयश्री खबाले,अँड.योगीता देशपांडे,निषा काळे,मनिषा आदलिंग, सोनाली भुजबळ,राकेश शुक्ल,महिला बचत गट अध्यक्षा,अंगणवाडी सेविका आदि उपस्थित होते.
महिलांना पुरूषांबरोबर स्थान
यावेळी सह दिवाणी न्यायाधिश एन.ए.शेख म्हणाल्या की जागतीक महिला दिन आत्ताच का साजरा करावा लागतो,तर महिलांना कायद्याचे बरोबरीचे स्थान मिळालेले आहे.स्त्रियांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगीक छळवणूक बाबत असणारा कायदा,प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी होणारी लैंगीक छळवणूक यासाठी न्यायालयाने एक कमीटी तयार केल्याचे सांगीतले.यावेळी जूई नवले व योगिता देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रूषिकेश कोथमिरे यांनी केले तर आभार किरण लोंढे यांनी मानले.