हजारो महिलांनी घेतल प्रशिक्षणाचा लाभ
पिंपरी : सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही, जिथे महिला नाही. तरीदेखील असा एक वर्ग आहे महिलांमध्ये ज्यांना सबल करण्याची गरज आहे. स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. शहरातील महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न होत आहे. चिंचवड येथील वंडर वेव्हज ब्युटी ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून प्रधानमंत्री कौशल्य योजनेंतर्गत आजवर अनेक महिला सक्षम झाल्या आहेत. कौशल्य विकास योजनेंतर्गत देशातील विविध राज्यातून आलेल्या हजारो मुलींनी येथे प्रशिक्षण घेतले असून यातील जवळपास सर्वच महिला आपल्या पायावर उभ्या राहण्यासाठी सक्षम झाल्या आहेत.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2018/10/chaya-bhalerao-2.jpg)
हे देखील वाचा
चिंचवडच्या वंडरवेव्हज ब्युटी ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका छाया भालेराव यांनी एनएससीच्या पार्टनर आहेत. त्यांच्या वंडरवेव्हज ब्युटी क्लिनीकच्या माध्यमातून वर्षभरात पीएमकेव्हीवाय अर्थात प्रधानमंत्री कौशल्य योजनेंतर्गत जवळपास 1000 प्रशिक्षणार्थींना ब्युटी पार्लर व जीएसटीबाबत मोफत प्रशिक्षण दिले आहे. प्रत्येकाला काम देणे हा प्रधानमंत्री कौशल्य योजनेचा उद्देश असून त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य शिकविणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. या योजनेंतर्गत सेंटरच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी ब्युटी पार्लरचे मोफत कोर्स चालविण्यात येत असून महिलांना व्यवसाय निर्मितीसाठी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावर्षीही टीओटी कोर्ससाठी पीएमकेव्हीवाय सेंटरमधून 10 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी जम्मु, तामिळनाडू, हरियाणा, छिंदवाडा, मध्य प्रदेश, कर्नाटक, बेंगलोर, उटी, महाराष्ट्रातील नगर, श्रीरामपूर, जुन्नर, आळेफाटा, वाघोली येथून महिलांची निवड केली आहे. निवड झालेल्या मुलींनी दहा दिवसांत या केंद्रातून कौशल्य प्रशिक्षणासह सर्वांगिण विकासाचे शिक्षण घेतले. केंद्राच्या या योजनेंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी चालना मिळत असून आजवर अनेकजण या प्रशिक्षण योजनेद्वारे प्रशिक्षीत होऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दिल्लीतून शिक्षक येतात. या दहा दिवसात कौशल्यधारित अभ्यासक्रमाबरोबर बर्याच गोष्टी शिकायला मिळतात, अशा भावना प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केल्या.