चाळीसगाव। महिलांनी दैनदिन जीवनातील सर्व जबाबदार्या व्यवस्थितपणे पार पाडून स्व:विकासावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपलब्ध असलेल्या संधी शोधून आपला व आपल्या कुटुंबाचा देखील विकास करून घेतला पाहिजे असे आवाहन केले. महिलांना पुरुषांपेक्षा कुटुंबाला जास्त वेळ द्यावा लागतो त्यामुळे त्यांच्यात असलेल्या कला-गुणांना पाहिजे त्या प्रमाणात वाव मिळत नाही. त्यासाठी आपल्याला मिळेल त्या वेळेत आपण आपल्या कला, गुण, विचार हे इतरांसमोर मांडावे असे प्रतिपादन उमंग समाजशिल्पी महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी केले. उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे महिलांसाठी, महिलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. संपदाताई पाटील यांनी महिलांना विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.
यावेळी महिलांना व्यक्तिमत्व विकासावर आधारित विविध महिलांचे व्हिडीओ दाखविले. जगातील विविध महिलांनी प्रतिकूल परिस्थितीतून देखील आपल्यातील क्षमता ओळखून प्रगती साधली याचे दाखले दिले. यावेळी महिलांशी विविध विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी सुवर्णा राजपूत, निता चव्हाण, डॉ.ज्योती पाटील, साधना पाटील तसेच उमंग महिला मंडळ कोअर टीमच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.