निगडी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्यावतीने निगडी बसस्टॉप येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्टॉपवर येणार्या महिलांना सौभाग्याचे वाण दिले. काही तृतीयपंथियांनी देखील या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी महिलांना वाण म्हणून आरोग्यासाठी महत्वाचा असणारा गुळ, ओला – सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी प्लॅस्टिक बॅग व एक कापडी पिशवी देण्यात आली. कचरा व्यवस्थापन करण्याचे धडे यातून महिलांना दिले.
महिला आघाडी अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, संगिता ताम्हाणे, अपर्णा डोके, स्वाती काटे, सुमन पवळे, संगिता कोकणे, अपर्णा मिसाळ, लता ओव्हाळ, विश्रांती पाडाळे, कविता खराडे, पुष्पा शेळके, शकुंतला भाट, मीनाक्षी उंबरकर, आशा जवळकर, शहजादी सैय्यद, शीला भोंडवे, मनीषा गटकळ, पल्लवी पांढरे, आशा शिंदे, पौर्णिमा पालेकर, रुपाली गायकवाड सविता खराडे आदी उपस्थित होत्या.