महिला दिनानिमित्त गुरूवारी मोफत आरोग्य शिबिर
पिंपरी : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 8) प्रभाग क्रमांक 14 मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, रामनगर मधील महिलांसाठी नगरसेविका मीनल यादव यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन जिजामाता सांस्कृतिक भवन, मोहननगर चिंचवड येथे होणार अआहे. याप्रसंगी उपमहापौर शैलजा मोरे, उपायुक्त स्वाती झगडे, पिंपरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक रत्ना सावंत, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सुलभा उबाळे, नगरसेविका सविता वायकर, चारुशीला कुटे, शारदा बाबर, डॉ सरोज अंबिके आदी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्तनरोग चिकित्सा, मासिकपाळी संबंधी तक्रारी, स्त्रियांचे विविध आजार, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी, ईसीजी, अस्थिघनता आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मागीलवर्षी प्रभागातील महिलांसाठी घेण्यात आलेल्या क्लासेसचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ प्रभागातील जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन नगरसेविका मीनल यादव यांनी केले आहे.
जागतिक महिलादिना निमित्त पुरस्कार
पिंपरी नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. 31 मार्च रोजी जिल्हा पातळीवर पुरस्कार देऊन त्यांच्या मौलिक कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. हे पुरस्काराचे 9 वर्ष आहे. यासाठी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारीता, साहित्य, कायदे विषयक, संगणक अशा विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलांनी आपण करीत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती पाठवावी. अधिक माहितीसाठी नंदकिशोर कल्चरल सोसायटी, यमुनानगर, निगडी किंवा 9371099911 किंवा 9860798557 या क्रमांकावर संपर्क साधावा.