महिलांमुळे देशाच्या विकासाला गती

0

वरणगाव । विकासात महिलांचे योगदान महत्वाचे आहे. अगदी शेती क्षेत्रापासून ते वैमानिकापर्यंत महिला काम करत आहेत. आपल्या देशात कर्तृत्वान महिलांची एक समृध्द परंपरा आहे. राजमाता जिजाऊ पासून ते प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पर्यंत सर्वच महिलांनी या देशाला घडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. म्हणून फक्त महिला दिनीच महिलांचा सन्मान न करता समपूर्ण आयुष्यभर माहिलांचा सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन वरणगांव महाविद्यालयात आयोजीत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रा.व्ही.ई. पाटील यांनी केले.

याप्रसंगी कार्यक्रमास वरणगांव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य अंनतराज पाटील, उपप्राचार्य के.बी. पाटील, वृषाली जोशी, संध्या निकम, अमेरीकेतून आलेल्या कोमल चौधरी, प्रा.डॉ. एस.ए. गायकवाड आदी मान्यवरांनी सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजामाता, माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व महाविद्यालयातर्फे मान्यवरांचा व विद्यार्थांनीचा सत्कार करण्यात आला.

रावेर येथे महिलांची मतदार नोंदणी
स्वामी समर्थ महाविद्यालयात महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तहसिलदार विजयकुमार ढगे होते. वनक्षेत्रपाल आर.जी. राणे, पोलिस निरीक्षक कैलास काळे, नायब तहसिलदार कविता देशुख, वैद्यकिय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, डॉ. ठाकुर, प्रकाश पाटील, दिपक नगरे, प्रा. मिलींद बिंबे उपस्थित होते. या कार्यक्रमातून तहसिलदारांनी महसुलच्या विविध योजनांची माहिती देऊन महिला मतदार नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. पोलिस निरीक्षक काळे यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले.

आरोग्य तपासणी शिबीर
शहरातील डॉ.प्रतिभा बोरोले त्वचारोग तपासणी शिबिर घेण्यात आले. जामनेर रोडवरील डॉ.खेमचंद बोरोले यांच्या हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तपासणी शिबिरात गरजूंची तपासणी करण्यात आली. या शिबिरात मुरुम, मुरुमानंतरचे काळे डाग, वांगचे डाग, पांढरे डाग, सोसायसीस, इसब, नखांचे आजार, केस गळणे, टक्कल पडणे आदींची तपासणी करून औषधोपचार सुचविण्यात आले. तसेच शिबिरात 40 वर्षे वयावरील महिलांची मोफत रक्तदाब मधुमेह तपासणी सुध्दा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रा. दिनू पाटील, प्रा. एस.ए. गायकवाड, प्रा.अशोक चित्ते, प्रा. सुधाकर मोते, प्रा. राहुल संदाशिव, प्रा. ए.जी. काटकर, प्रा. आजित कलवले, प्रा.वृक्षाली जोशी, प्रा. बी.जी. देशमुख, प्रा. अविनाश बडगुजर, प्रा. सुभाष मोते, प्रा. सुभाष वानखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. राहुल संदाशिव यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल चौधरी हिने केले. तर आभार प्रा. अनिल शिंदे यांनी मानले. आभार प्रा. अनिल शिंदे यांनी मानले.