महिलांसाठी आरोग्याचा चातुर्मास

0

औंध : दैनंदिन आहारावर लक्ष न दिल्याने, पौष्टिक आहाराअभावी व वेळेवर जेवण न केल्याने महिलांना आरोग्यासंबंधी तक्ररींचा सामना करावा लागतो. कॅल्शियम व हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्तदाब, थकवा व वजनात कमी-अधिक त्रास उद्धवतात. महिला स्वस्थ राहिल्या तरच परिवार स्वस्थ राहणार. म्हणूनच महिलांनी आरोग्याची काळची घेणे गरजेचे आहे, असे मत आमदार विजय काळे यांनी व्यक्त केले.

औंध येथील पं. भीमसेन जोशी नाट्यगृहात शिवाजीनगर मतदारंसघातील महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रभाग समिती अध्यक्ष विजय शेवाळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, सुनीता वाडेकर, विनोद रणदिवे, आनंद जुनवणे यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ महिला डॉक्टर उपस्थित होत्या. विजय शेवाळे म्हणाले, प्रत्येक महिला ही कुटुंबाची काळजी घेत असते, त्यात तिचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. यामुळे तिला स्वत:ला विविध आजारांना सामोरे जावे लागते. आपल्या कुटुंबाची आपण समर्थपणे काळजी तीही कायमस्वरूपी घेऊ शकतो, हे महिलांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.