महिलांसाठी डिजिटल कार्यशाळा

0

पनवेल । प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनच्या वतीने महिलांकरिता डिजिटल साक्षरता कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी या कार्यशाळेत सहभागी होत महिलांना प्रोत्साहित केले. हा उपक्रम पनवेल आणि उरण परिसरातील महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी राबविणार असल्याचे घरत यांनी या वेळी सांगितले. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी हाती घेतले आहे.
महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे शिवधनुष्यही त्यांनी उचलले आहे. नवीन पनवेल येथील प्रथम सीआयटीआय सेंटरतर्फे महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रशिक्षण वर्गाला रत्नप्रभा घरत यांनी गुरुवारी भेट दिली.

या प्रशिक्षण शिबिरात भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस हिना भक्ता, माजी नगरसेविका वर्षा नाईक, लीना पाटील, श्वेता खैरे, इंदुमती पाटील, कुंदा मेंगडे, विद्या तामखडे, नंदा ठाकूर, मनीषा घरत, स्नेहलता ठाकूर, जयश्री कोळी, राधा म्हात्रे, दमयंती कोळी, सुवर्णा मगदूम सहभागी झाल्या होत्या.