महिलांसाठी 20 जागा राखीव

0

नंदुरबार। नंदुरबार नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज दि.20 जुलै रोजी सोडतीद्वारे आरक्षण घोषित करण्यात आले. यात नवीन रचनेनुसार 18 प्रभाग झाले असल्याचे व नगरसेवकांच्या 39 जागांपैकी 9 जागा अनुसूचित जाती व जमातीसाठी तर 20 जागा महिलांसाठी राखीव झाल्याचे स्पष्ट झाल्याने अनेक इच्छूकांचा हिरमोड झाला.उपविभागीय अधिकारी निमा आरोरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडत विषयक सभेत नगरपालिका मुख्याधिकारी गणेश गिरी आणि त्यांचे सहकारी यांनी कामकाज हाताळले.

एका शाळकरी विद्यार्थ्याच्या हातून चिठ्ठी काढून आरक्षण सोडत करण्यात आली. आरक्षणाची माहिती घेण्यासाठी आजी, माजी नगरसेवकांसह विविध भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी उत्सूकतेने उपस्थित होते. आरक्षणानुसार नंदुरबार शहरातील अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग क्र. 7, 13 व 18 चे अ, अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग क्र.13 अ व 18 अ, अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्र.1,4,8,9,17 यापैकी तीन महिला आदिवासी राखीव असून त्यात 4 अ, 8अ आणि 17 यांचा समावेश आहे