‘चल कचेरीला चल तारा, काढू या सातबारा उतारा’; तहसीलदार ज्योती देवरे यांचे आवाहन
जिल्हा माहिती कार्रालरातर्फे संवाद पर्वाचे आयोजन
धुळे । पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनीत राबण्यात महिला नेहमीच पुढे असतात. मात्र, जमिनीच्या सातबारावर महिलांचे नाव नसते. ’लक्ष्मी मुक्ती’ योजनेंतर्गत या जमिनीच्या सातबारावर सहधारक म्हणून महिलांचेही नाव लागू शकते. त्यामुळे महिलांनी तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून आपला अर्ज द्यावयाचा आहे, असे प्रतिपादन धुळे शहरच्या अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय धुळे यांच्यातर्फे संवाद पर्व हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून धुळे शहरातील इंदिरा गार्डन परिसरातील वंदे मातरम प्रतिष्ठान येथे जिल्हा वार्षिक योजनेतून तयार केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या स्क्रोलर्सचे उद्घाटन अपर तहसीलदार देवरे यांच्या हस्ते झाले. त्रावेळी त्रा बोलत होत्रा.
एकपात्री प्रयोग
‘मी गर्भातील मुलगी बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. त्यांनी स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन करीत ’बेटी बचाव-बेटी पढावचा’संदेश दिला. तसेच मुलगी वाचविणे काळाची गरज असल्याचेही सांगितले. या एकपात्री प्रयोगास उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या गझलने समारोप झाला. योगेश्वरी मिस्तरी यांनी जिम्नॅस्टिकची विविध प्रात्यक्षिके यावेळी दाखविली. माहिती सहाय्यक गोपाळ साळुंखे, मनोहर पाटील यांनी संवाद पर्व या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. पाटील यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली.
मिळकतीत पत्नी ही निम्म्याची वाटेकरी
यावेळी जिम्नॅस्टिकची प्रसिध्द खेळाडू व योगेश्वरी मिस्तरी, विशाल देवरे, डॉ.संदीप पाटील, कृपेश नांद्रे, गिरीश मराठे, प्रशांत मेखा, अमोल चौधरी, संदीप पाटील, सागर चौधरी, ईश्वर वाघ, सुधीर बोरसे, नीलेश राजपूत, सचिन बोरसे, सुशील बोरसे, हरीश चौधरी, संजय ठाकरे, सुनील पाटील, बाळा शिनकर, सतीश पाटील, महेश कुवर, अभय पाटील आदींसह वंदे मातरम प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल विभागाच्या ’लक्ष्मी मुक्ती’ योजनेंतर्गत सहधारक म्हणून पतीच्या मिळकतीत पत्नीचे नाव लागू शकते. त्यामुळे पतीच्या मिळकतीत 50 टक्के हिस्सेदार होण्याचा हक्क महिलांना प्राप्त होतो. पत्नीच्या संमतीशिवाय पतीला जमिनीच्या विक्रीचा व्यवहार करता येत नसलल्राचे देवरे रांनी रावेळी नमूद केले. देवरे यांनी स्वरचित ‘चल कचेरीला चल तारा, काढू या सातबारा उतारा’ हे गीत सादर केले.