महिला आघाडीतफे वृक्षारोपण

0

जळगाव। येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीच्या वतीने शांती नारायण नगर, रामेश्‍वर कॉलनी परिसरात, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिजित पाटील, तालुका अध्यक्ष रमाताई ढिवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यात कडूलिंब, आंबा, आवळा, बदाम, चिंच, औदुंबर, गुलमोहर आदी रोपांचा समावेश होता. प्रमुख उपस्थिती महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांची होती.

सागर सपकाळे, सुरेंद्र पाटील, बंटी मराठे, आकाश पगारे, लता वाघ, सोनल याहीडे, रवी भोई, दीपक पाटील, सुरेखा बेडसे, नितीन दहीयेकर, सुधाकर ढिवरे, मिलींद याहीडे, योगेश वाणी, लक्ष्मण मरसाळे, पुजा कोळी, सागर, पवार, अंजनासिंगे, हर्षाली देवरे, गोदाबाई राठोड, विनोद बिर्‍हाडे, पंकज राठोड, लोकेश जंजाळकर, ईश्‍वर चंद्रे, किरण कोळी, पिंटु गायकवाड यांच्यासह आदी उपस्थिती होती.