महिला आरक्षणाने सत्तेचे समिकरण बदलणार

0

भडगाव । जिल्हा परिषदेच्या तीन गटात 10 उमेदवार तर पंचायत समितीच्या सहा गणातुन 22 उमेवार रिंगणात असुन तिन्ही गटात व सहा गणात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी समोर भाजपाने आव्हान दिले असुन तालुक्यात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व राष्ट्रवादीचे आमदार सतिष पाटील ,माजी आमदार दिलिप वाघ यांची कसोटी लागणार आहे. तालुक्यात जि.प. तीन गट असुन तिन्ही गट महिला आरक्षण असुन तालुक्यात महिला राज येणार कजगाव-वाडे व गिरड-आमडदे हे दोन्ही गट अनुसुचित जमाती महिला तर गुढे-वडजी हा गट सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने या गटात रंगतदार लढत होणार आहे.

क जगाव-वाडे गटातुन वनिता विजय गायकवाड भाजपा, किर्ती जालिंदर चित्ते शिवसेना, दुर्गा अशोक सोणवने राष्ट्रवादी. गिरड-आमडदे गटातुन स्नेहा नाना गायकवाड राष्ट्रवादी, नम्रता फकीरचंद सोनवणे शिवसेना, शीतल प्रमोद सोनवणे भाजपा तर गुढे-वडजी गटातुन अंकिता किशोर पाटील भाजपा, कल्पना संजय पाटील शिवसेना, शकुंतलाबाई पुंडलीक पाटिल राष्ट्रवादी, सारीका संजय सोनवणे अपक्ष हे उमेदवार रिंगणात आहेत. गुढे-वडजी या गटात भाजपाकडून अंकिता पाटील यांना उमेदवारी दिली असुन त्या शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष जे.के.पाटील यांची मुलगी तर शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांची सुन आहेत. शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे विद्यमान तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करुन त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांना उमेदवारी मिळवली तर भैय्यासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीकडून त्याच्या मातोश्री शकुंतलाबाई पाटिल यांना उमेदवारी मिळवली या गटात शिवसेनेचे पदाधिकारी कोणाचे काम करणार याकडे लक्ष लागुन आहे.

पंचायत समितीसाठी तिरंगी लढत

पंचायत समितीत सत्तेची समिकरण बदलणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. कजगाव गणात डॉ.अर्चना पाटील भाजपा, कोकीळा माधवराव पाटील शिवसेना, वंदना दिलिप पाटील राष्ट्रवादी. वाडे गणात प्रदिप भिल अपक्ष, रावण श्रीपत भिल शिवसेना, संजय देवचंद भिल भाजपा, देवाजी मोतीलाल सोनवणे राष्ट्रवादी, गुढे गणात सायजाबाई ओंकार पाटील राष्ट्रवादी, संगीता सुरेश पाटील भाजपा, हेमलता विकास पाटील शिवसेना, वडजी गणात बाबुराव पाटील राष्ट्रवादी, रामकृष्ण पाटील शिवसेना, पृथ्वीराज राठोड अपक्ष, पुरुषोत्तम अभिमन सोनवणे भाजपा. गिरड गणात अनिल काळे अपक्ष, निवृत्ती बाविस्कर शिवसेना, श्रावण लिंडायत भाजपा, प्रताप सोनवणे राष्ट्रवादी, आमडदे गणात अलकाबाई पाटील भाजपा, आशाबाई पाटील अपक्ष, उज्वला पाटील शिवसेना, भारती पाटील राष्ट्रवादी हे उमेदवार रिंगणात असुन काँग्रेसकडून तालुक्यात एकही उमेदवार दिलेला नाही. भाजपा राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.