नवी दिल्ली-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत आघाडी असलेल्या राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. यात त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलाला एक तृतीयांश आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव पारित करण्याचे आवाहन केले आहे.
या अगोदर देखील राहुल गांधी यांनी संसदेत सरकारसमोर दोन अटी-शर्ती ठेवली आहेत. तिहेरी तलाक आणि निकाह हलाला संबंधित बिलाला कॉंग्रेस समर्थन देईल त्याबदल्यात सरकारने देखील महिला आरक्षणाचे समर्थन करावे अशी मागणी केली आहे.
२० नोव्हेंबर रोजी ओडिशा विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत ठराव संमत केले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हा प्रस्ताव पारित केला आहे.