महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी आरोग्य व कराटे शिबिर

0

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड माहिला काँग्रेस कमिटीच्यावतीने दि. 22 जानेवारी ते 24 जानेवारी असे दोन टप्प्यात शहरातील महिलांसाठी हळदीकुंकूवाचे निमित्ताने सौभाग्यचे वाण म्हणून महिलांसाठी आरोग्याचे शिबिर घेण्यात आले. डॉ. सविता बाजारे यांनी तपासणी केली. गणेशनगर पिंपरीमधील समाजमंदिरात आयोजित या शिबिराचा 40 महिलांनी लाभ घेतला.

कराटेची एकदिवशीय कार्यशाळा
कन्यादिन निमित्ताने शहरातील युवतीसाठी महिला काँग्रेसच्यावतीने स्वसंरक्षणासाठी कराटेची एक दिवस कार्यशाळा घेण्यात आली. राजेंद्र सोलोंके यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरिक संस्था विरंगुळा केंद्र येथे आयोजित या कार्यक्रमास प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व पिंपरी चिंचवड निरीक्षक रेणू पाटील, युवती सेलच्या सहनिरीक्षक रुपाली कापसे यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी प्रास्ताविक केले. महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगिता काळसकर यांनी आभार मानले. भोसरी ब्लॉक अध्यक्षा उषाताई कळसे, सेक्रेटरी हुरबानो शेख, जनरल सेक्रेटरी मीना गायकवाड, सुनीता कामथे, अलका पाटील यांनी सहभाग घेतला.