महिला कॉग्रेस तालूकाध्यक्षपदी अख्तर बी.शेख

0

जामनेर। येथील नगर परिषदेच्या महिला नगरसेविका अख्तर बी.अब्दुल गफ्फार शेख यांची नुकतीच तालूक्याच्या महिला कॉग्रेसच्या तालूकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

सुलोचना वाघ यांनी नियुक्त पत्र दिले आहे. यावेळी चारूलता टोकस, डाँ.उल्हास पाटील, उदय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. निवड झालेल्या अख्तर बी. पहिल्या मुस्लिम महिला आहेत. पारस ललवाणी, मुकुंदा सुरवाडे आदींनी त्याचे अभिनंदन केले.