ठाणे । येथील पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्द्ल पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त निपुगे आणि पोलीस शिपाई अमोल फापाळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सुभद्रा पवार या मुळच्या अहमदनगरमधील होत्या. सध्या नोकरीच्या निमित्ताने त्या कळवा येथील मनीषा नगर येथे भाड्याने राहत होत्या. महिला कॉन्स्टेबलच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुपारी 2.30 च्या सुमारास राहत्या घरातील रूममध्ये लोखंडी पंख्याला गळफास घेऊन पवार यांनी आपले आयुष्य संपवले.