आमदार किशोर पाटील यांचे प्रतिपादन
स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणाऱ्या जनरल नॉलेज पुस्तकाचे वाटप
पाचोरा – शेतीला जोडधंदा म्हणून शेळी मेंढी पालन अतिशय उत्तम व्यवसाय आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून माता-भगिनी संसाराचा गाडा चालविण्यासाठी कष्ट करीत राहतात. महिला खऱ्या अर्थाने संसाराचा आधार असतात. चूल-मूल ही जबाबदारी सांभाळून देखील माता-भगिनी आर्थिक उत्पन्नात देखील भर घालतात. असे प्रतिपादन आमदार किशोर पाटील यांनी केले. तालुक्यातील सातंगाव (डोगरी) येथील सावित्रीबाई फुले महिला बंदिस्त शेळी-मेंढी पालन व्यवसाय सहकारी संस्था सातगाव या संस्थेच्या फलकाचे अनावरण तथा सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणाऱ्या जनरल नॉलेज पुस्तकाचे वाटप समारंभ आमदार किशोर पाटील व माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या संपन्न झाला. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते.
महिलांना योग्य मार्गदर्शन करून जगण्याची दिली दिशा
यावेळी व्यासपीठावर उपस्थित ॲङ दिनकरराव देवरे, सिकंदर तडवी, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, महिलांनी अनेक व्यवसायात उभारले पाहिजे. त्यासाठी आपणास अर्थसाह्यासाठी गरज पडल्यास बँकामार्फत आपल्यास कर्ज उपलब्ध करून देईल. आपण सर्व जाती-धर्माच्या महिला एकत्र येऊन ग्रामीण भागामध्ये एक नवा आदर्श निर्माण करून दिला आहे. मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. माजी आमदार आर.ओ.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात नव्या तरुण पिढीला सांगितले की आजची तरुण पिढी शिक्षण मोठ्या प्रमाणात घेतले असून तरी देखील नोकरी मिळत नाही. युवकांनी निराश होऊ नका खचून जाऊ नका शासकीय सेवा करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करा. गणित, सामान्य ज्ञानाच्या कास धरा, उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हा यासाठी प्रचंड मेहनत करा, असे देखील मार्गदर्शन केले.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
जिद्दी चिकाटीतून यश आपल्या पदरात पडेल. ग्रंथ आपले गुरु मित्र असतात. त्यांचा सांभाळ करा ते तुम्हाला सांभाळतील तुमच्या भावी जीवनासाठी माझ्या शुभेच्छा. यावेळी अनिताताई, आशाताई बोरसे, राजू चव्हाण अमरसिंह ,अशोक सुकदेव, दीपक जमदाडे, राजू बोरसे, पंडित डामरे, भास्कर डांबरे, सुभाष पाटील, सुवर्णा पाटील, हिम्मत पाटील, नाना पाटील, कैलास पांडे, भगवान पांडे, शिवसेनेचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.