शिक्रापूर :- आजच्या काळामध्ये महिला घराबाहेर पडू लागल्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर असल्यामुळे महिलांना देखील आता चांगली प्रतिष्ठा मिळत असल्याचे मत लागीर झाल जी मालिकेतील अभिनेत्री शिवानी गाडगीळ यांनी व्यक्त केले.
वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील माहेर संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात बोलताना त्या बोलत होत्या, याप्रसंगी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, चित्रपट निर्माते नवनाथ टेमगिरे, लागीर झाल जी मालिकेतील अमित कुलकर्णी, राहुल जगताप, सिनेकलाकार यश दौंडकर, आयुब शेख, श्रीकांत धुमाळ, विक्रम दुपारगुडे, पत्रकार शेरखान शेख, कोरेगाव भिमाच्या सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या पूजा भोकरे, संगिता भोकरे, गोविंद कांबळे, डॉ. राजेश व्यवहारे, बन्सीशेठ वाडेकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे व मंगेश पोळ यांनी केले तर प्रास्ताविक तेजस्विनी पवार व अतुल शेळके यांनी केले तर माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी आभार मानले.
माहेरचे काम कौतुकास्पद
यावेळी बोलताना गाडगीळ म्हणाल्या स्त्रियांना पाहून आज वेगळे समाधान आणि आनंद मिळत आहे. माहेर संस्था करत असलेले कार्य कौतुकास्पद तसेच आदर्शवत आहे. यावेळीआयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून विशेष कामगिरी करणार्या संगिता पवार, रेखा गायकवाड, मोहिनी ढगे, पल्लवी रणदिवे, प्रमिला इशी, सोनाली शेलार, जयश्री ढगे, सिता बेंडभर या महिलांचा सन्मान करण्यात आला.
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न
यावेळी बोलताना माहेर संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी या पुढील काळामध्ये देखील विशेष प्रयत्न करणार असल्याचे माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी सांगितले. तसेच आजच्या काळामध्ये महिला वेगवेगळ्या क्षेत्रातून भारताचे नाव उज्वल करत असून महिलांबाबत अभिमान वाटत असल्याचे सिनेकलाकार आयुब शेख यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विक्रम भुजबळ, रमेश चौधरी, हरीश अवचर, संदीप म्हेत्रे, अनिता भालेराव, मिनी एम. जे, आनंद सागर, प्रकाश कोठावळे यांनी विशेष परिश्रम घेतले