जळगाव । राष्ट्रीय चिकित्सक दिनानिमित्त 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान डॉक्टर सुरक्षा सप्ताह साजरा झाला. या सप्ताहाचा समारोप नुकताच आयएमए सभागृहात डॉक्टर महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन करण्यात आला. या कार्यक्रमात ‘भारतीय नृत्यकला’ महिला डॉक्टर्स व त्यांच्या मुलींनी सादर केल्यात. 145 महिला डॉक्टर्स यांची उपस्थिती होती. तसेच नऊ विविध भारतीय नृत्यकला सादर करण्यात आल्यात. इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव महिला कार्यकारिणी सदस्य डॉ.तिलोत्तमा गाजरे, महिला समिती अध्यक्ष डॉ.दर्शना शहा यांनी आयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. ज्येष्ठ महिला डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भारतीय नृत्यकलेचे सजावटीकरण यावेळी डॉक्टर महिलांनी स्वतः केले. सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.सीमा पाटील, डॉ.अनिता भोळे, डॉ.रुपाली बेंडाळे, डॉ.सोनाली जैन, डॉ.दिप्ती नेहते, डॉ.सारिका पाटील व डॉ.गीतांजली लाठी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.अंजुम अमरेलीवाला व डॉ. वैशाली चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.जयश्री राणे यांनी केले.