महिला दिनानिमित्त गुणवंत महिलांचा सन्मान

0

नारायणगाव : जागतिक महिला दिनानिमित्त नारायणगाव ग्रामपंचायततीच्या वतीने येथील गुणवंत महिलांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच योगेश पाटे म्हणाले ,अत्ताच महिला दिन ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य-दिव्य स्वरुपात साजरा केला जाईल. त्यासाठी गावातील गुणवंत महिलांची निवड करून त्यांना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका शोभा सुरेश डोंगरे, अंगणवाडी सेविका सुषमा प्रदिप भास्कर, शैलजा दत्तात्रय कोर्‍हाळे, अंगणवाडी मदतनीस शारदा प्रकाश डेरे, सुनिता अशोक पांचाळ, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी हिराबाई विनायक खुडे यांना ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला. ग्रामपंचायत सदस्या सारिका डेरे, संगिता खैरे यांनी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास सरपंच योगेश नामदेव पाटे, उपसरपंच संतोष दांगट, सदस्य आरिफ भाई आतार, राजेश बाप्ते, गणेश पाटे, ज्योती दिवटे, रुपाली जाधव, सारिका डेरे, अनिता कसाबे, अश्‍विनी गभाले, सुप्रिया खैरे,पुष्पा आहेर, कुसुम शीरसाठ, संगीता खैरे, मनिषा मेहेत्रे,अंगणवाडी सुपरवायझर लोहकरे मॅडम, वैद्यकीय अधिकारी घोरपडे, जि.प.शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या व ग्रामपंचायत कर्मचारी व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एन.जे.नाईकडे यांनी तर आभार उपसरपंच संतोष दांगट यांनी मानले.