महिला दिनानिमित्त प्रतिष्ठा महिलांतर्फे 10 रोजी व्याख्यान

0
भुसावळ- शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार, 10 रोजी दुपारी चार वाजता संतोषी माता सभागृहात ‘किचन वेस्ट मॅनेजमेंट व किचन गार्डनिंग’  या विषयावर प्रा.राजेंद्र शिंदे (धुळे) व कौस्तुभ यद्रे यांचे व्याख्यान होणार आहे. प्रसंगी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.मनीषा दावलभक्तदेखील मागदर्शन करणार आहेत. शहरातील नागरीकांसह महिला व शेतकर्‍यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
कचर्‍याची समस्या बिकट -सावकारे
सध्या कचर्‍याची समस्या अत्यंत बिकट असून या व्याख्यानाद्वारे कचरा प्रॉडक्शनते मार्केटींगपर्यंत चालणारी सर्व प्रक्रिया सविस्तर व्याख्याने स्लाईड श्‍वोद्वारे समजावून सांगणार आहेत. आपल्या घर व परीसराप्रमाणे शहर स्वच्छ ठेवणेदेखील आपले जबाबदारी असून शहरातील नागरीकांसह महिला व शेतकर्‍यांनी आवर्जून या व्याख्यानाचा लाभ घेतल्यास निश्‍चित स्वच्छता राखण्यास मदत होईल, असा विश्‍वास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी व्यक्त केला.