महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

तळेगाव दाभाडे । तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार, खेळ पैठणीचा, एकांकिका तसेच गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सभापती संध्या गणेश भेगडे यांनी दिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारीका भेगडे या उपस्थित राहणार आहेत. शहरातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या आदर्श महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी महिलांसाठी खेळ पैठणीचा तसेच एकांकिकेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व महिलांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन भेगडे आणि उपसभापती प्राची हेंद्रे यांनी केले आहे. तसेच शहरातील विविध भागातून महिलांची दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.