महिला दिन उत्साहात साजरा

0

भुसावळ। शहर व परिसरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला.

डीआरएम कार्यालय
रेल्वे प्रबंधक कार्यालय वाणिज्य विभागात महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनिल मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ वाणिज्य प्रबंधक व्ही.पी. दहाट, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार, मंडळ वाणिज्य निरीक्षक एस.एम. कडुस्कर उपस्थित होते.

आर.जी.डी. विद्यालय, मुक्ताईनगर
येथील आर.जी.डी. विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक बी.एस. वानखेडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांच्या प्रगतीमुळे देशाच्या प्रगतीलाच हातभार लागत असून आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रणी असल्याचे सांगितले. पर्यवेक्षक आर.सी. पाटील, एस.एम. महाजन, बी.डी. बारी, भारती सपकाळ, वृषाली भोकरीकर, बी.आर. पाटील उपस्थित होते. सुत्रसंचालन आर.सी. पाटील यांनी तर आभार बी.डी. बारी यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय वाडिले, निलेश पाटील, राहुल भोई, प्रविण भोई आदींनी परिश्रम घेतले.

रेल्वे रुग्णालय
रेल्वे रुग्णालयात महिला आरोग्य शिबीर घेण्यात आलेे. डीआरएम सुधिरकुमार गुप्ता यांच्या पत्नी संध्या गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिलांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमास डीआरएम सुधिरकुमार गुप्ता, अप्पर मंडळ प्रबंधक अरुण धार्मिक, मुख्य वैद्यकीय अधिकारी राकेश पंचरत्न, वरिष्ठ कार्मिक अधिकारी तुशाबा शिंदे, डॉ. प्रदिप नाईक, डॉ. श्रध्दा पंचरत्न, डॉ. दिपा रत्नानी उपस्थित होते.

खिर्डी उर्दू शाळेत कार्यक्रम
खिर्डी जिल्हा परिषद उर्दू शाळेत जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेतील मुलींची पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.तसेच शाळेतील शिक्षकांनी ’महिला एक विश्वास’ या विषयावर व्याख्यान दिले. समाजातील असामान्य कर्तूत्वान स्त्रियांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक अहेमद खान समद खान, उपशिक्षक आदिल खान, एजाज़ अहेमद, जावीद खान, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नईम बेग, रिज़वान खान, सादिक पिंजारी, हलीमा बी उपस्थित होत्या.