वरीष्ठांकडे तक्रार करण्याचा वरणगावच्या बैठकीत संघटनेचा निर्णय
वरणगाव:- महिला पर्यवेक्षिकेकडून होणार्या सातत्याने होणार्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वरीष्ठांकडे तक्रार करण्याचा निर्णय जिल्हा परीषद मराठी शाळेत झालेल्या बैठकीत घेतला. अंगणवाउी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत 64 महिला कर्मचार्यांची उपस्थिती होती. पर्यवेक्षिका कल्पना तायडे (कोसोदे) यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध वरीष्ठ अधिकार्यांसह जिल्हाधिकार्यांकडे 2 मे रोजी तक्रार करण्याचे याप्रसंगी एकमताने ठरले.
देखरेखीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक
वरणगाव येथे सुरुवातीपासून वाढत्या लोकसंख्येनुसार महिला व बालकल्याण विभागाने शहराच्या विविध भागात 32 अंगणवाडयांची निर्मिती करून अनुमती दर्शविली आहे. त्या दृष्टीकोनातून 64 सेविका आणि मदतनीस म्हणून महिला कर्मचार्यांची मानधन तत्वावर नियुक्त्यादेखील केल्या आहेत. त्यांच्यावर देखरेख म्हणून महिला पर्यवेक्षकाचीदेखील नेमणूक आहे मात्र ऑक्टो 2017 पासून संबंधीत पर्यवेक्षक देखरेखीच्या नावाखाली सेविका व मदतनीसांना वेठीस धरून आर्थिक पिळवणूक व मानसिक त्रास देत असल्याबाबत याप्रसंगी उपस्थित कर्मचार्यांनी तक्रारी केल्या. अंगणवाडी सेविका व मदतनीस संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण पाटील व भुसावळ तालुकाध्यक्षा चेतना गवळी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पर्यवेक्षिका कल्पना तायडे विरुद्ध तक्रार करण्याचे ठरले
यांची होती उपस्थिती
यावेळी वंदना मेढे, तुळसा इंगळे, अनिता नारखेडे, सुनीता माळी, स्वाती चौधरी, ललिता कुरील, साधना जाधव, पुष्पा जाधव, रूपाली माळी, नंदा भोई, सरला इंगळे, रत्ना चौधरी, रेखा महाजन, आशा वंजारी, मंगला महाजन, शारदा इंगळे, उज्ज्वला पाटील, शकुंतला सुरवाडे, माधुरी मोरे, नयना तायडे, अलका सुरवाडे, सिंधू अहिरे, सिंधू राऊत, विमल नेहते, मनिषा महाजन, उषा नेरकर, सुमती मोडक, कल्पना चौधरी, सुलभा दखनकर, रजनी झांबरे, मंगला चव्हाण, आशा भवणे, सरोज चौधरी, यागिता कापडे, सुरेखा पवार, शारदा तायडे, सुनंदा पाटिल, संगीता माळी, नंदा भोई, प्रमिला धनगर, सुग्राबी मन्यार आदी अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या.