तळोदा । येथील महसुल उपविभागातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील पोलीस पाटीलपदासाठी महिला आरक्षण काढण्यात आले. तळोदा महसूल उपविभागातील तळोदा तालुक्यातील 46 व अक्कलकुवा तालुक्यातील 119 या दोन्ही तालुक्यातील एकूण 165 रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरिता महिला आरक्षण सोडत येथील प्रांत कार्यालयात प्रशासकीय इमारत सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसीलदार योगेश चंद्रे, अक्कलकुवा नायब तहसीलदार व्ही. बी. कच्छवे, तळोदा नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, शिरस्तेदर आर. आय. कोकणी, व्ही. आर. ससे, जे. जी. दुसाने आदींच्या उपस्थित काढण्यात आले.
लोकसंख्येनुसार आरक्षण सोडत
तळोदा तालुक्यातील 14 गावांतील पोलीस पाटील महिला आरक्षण इयत्ता दुसरीत विध्यार्थी सिफा फारूक पिंजारी या बालिका हस्ते काढण्यात आले.तर अक्कलकुवा तालुक्यातील 36 गावांच्या पोलीस पाटील महिला आरक्षण इयत्ता पहिलीचा विद्यार्थी रिहान फारूक पिंजारी या बालकाचा हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आले. तळोदा महसूल उपविभागातील पोलीस पाटील पदाकरिता मंजूर बिंदुनियमावली प्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार रिक्त पोलीस पाटील पदाचा रिक्त गावातील महिला आरक्षणाची निश्चिती संबधित लोकसंख्या नुसार करावयाची असून त्यासाठी महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. तळोदा तालुक्यातील 14 गांवातील पोलीस पाटील पद महिला आरक्षण निघालेली गांवे अशी सतोना, बियामळ अष्टे तर्फे बोरद, अमोनि, एकधड, चिनोदा, जुवणी (फॉरेस्ट) चोगाव बुद्रुक , गव्हाणीपाडा , गोपाळपूर, कुंडवे, कोठार, नलगव्हांन, मोड.अक्कलकुवा तालुका – तालुक्यातील 119 रिक्त पदांसाठी एकूण 36 गावांचा महिला आरक्षण काढण्यात आलेली गावे जामली, ठाणे, वडली, उघडसाग, विरपूर, वाण्याविहिर खुर्द, डोडवा ,रामपूर, नेदवांन बुद्रुक, सुरगस, मांडवा, पिंपरा पानी, जमली (उमरकुवा,) सलीबार, आंबाबारी, गुलीउंबर, मोठे उदयपूर, खडकापणी, डिगीआंबा, वेळखेडी, जुना नांगर मुठा, ब्रिटिश अंकुशविहिर, घूनशी, सरी, मोवान, पिंपरो पाडा, वालनबा,( रायसिंगपूर) वाण्याविहिर बुद्रुक मोरकी ,अरेठी, मोकस खापरान, पिंमटी, उमरगव्हान, महूपाडा, बोरीपाडा.