महिला पोलीस कर्मचार्‍याचाच मोबाईल लांबविला

0

जळगाव : नागरिकाचा मोबाईल लांबविल्याच एैकिवात आहे. मात्र ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे, अशा पोलिसाचा मोबाईल चोरी होतो तेव्हा मात्र आश्‍चर्य व्यक्त होते. अशीच घटना गुरुवारी शहरात घडली. शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा लग्नात जेवत असताना मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तिने तक्रार केली आहे.

शहरातील एका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत महिला कर्मचारी सोमवारी एका विवाह समारंभात गेल्या होत्या. यादरम्यान जेवणासाठी बसली असता तिने जेवण करत असताना टेबलावरच बाजूला ठेवला. जेवण झाल्यानंतर तिला तिचा मोबाईल गहाळ झाल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध केली. मात्र मोबाईल मिळून आला नाही. याबाबत तिने पोलिसात तक्रार केली आहे.

पायी चालणार्‍या महिलेचा मोबाईल गहाळ
रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेचा मोबाईल अचानक गहाळ झाल्याची घटना गुरूवारी बारा ते दीड वाजेच्या सुमारास शहरातील स्टेट बँक
ते टॉवरचौक दरम्यान घडली. संपदा कुळकर्णी या औरंगाबाद येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्याकामानिमित्त आज जळगाव शहरात आल्या होत्या. मुख्य स्टेट बँक शाखेत काम आटोपल्यानंतर त्या बारा वाजेच्या सुमारास आर.आर.विद्यालयामार्गे शहरात येत होत्या. टॉवर चौकात पोहोचल्यावर त्यांनी मोबाईलचा शोध घेतला असता त्यांना मोबाईल आढळून आला नाही. नंतर त्यांनी सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता रिंग गेली; परंतु कोणीही रिसीव्ह केला नाही. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन प्रकार कथन केला.