महिला फॅन्सना दिलासा

0

बाहुबलीनंतर प्रभासच्या फॅन्समध्ये विशेषतः महिला फॅन्समध्ये प्रचंड वाढ झाली आहेत. त्या फॅन्सना काहीशी दिलासादायक बातमी अशी आहे की तो एवढ्यात लग्न करणार नाही. प्रभासचं लग्न दीर्घकाळ चर्चेत होतं. हैद्राबादमधील श्रीमंत उद्योजकाच्या मुली पासून ते राणा दग्गुबातीची वधू पाहिजे अशी कोस्टारसाठीची जाहिरात अशा चर्चा रंगत होत्या. अनुष्का शेट्टीसोबतचे संबंधही चविने गप्पांमध्ये रंग भरत होते. प्रभासची असणारी नसणारी प्रकरणे उगीचच महिला फॅन्सना नाराज करीत होती. प्रभासनेच प्रसार माध्यमांना सांगितलं की (महिला) फॅन्सनी नाराज होऊ नये कारण लग्नाचा विचार सुद्धा मी केलेला नाही.

अनुष्का आणि प्रभास यांनी मिर्ची, हिल्ला, बाहुबली अशा फिल्ममध्ये एकत्र काम केले आहे. एखाद्या अभिनेत्रीबरोबर सलग काही चित्रपटांमध्ये काम केलं की लोक रिलेशनच्या अफवा पसरवतात, अस प्रभास सांगतो.