महिला बचतगटांच्या मेळाव्यास उदंड प्रतिसाद

0

पिंपरी : महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गणेश लंगोटे मित्र परिवारातर्फे मोहननगर, चिंचवड येथील शिवपार्वती सभागृहात प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन गणेश लंगोटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. रुपाली बापट, देवेंद्र पंडित, उमाजी ढाकणे, प्रसाद हिरणवाळे, शुभम नामदे, गणेश शहापूरकर, अविनाश वेताळे, विजय चावरिया, सचिन नामदे, आकाश नामदे उपस्थित होते.

नागरिकांचा उदंड प्रतिसाद
या उपक्रमांतर्गत मोत्याच्या शोभिवंत वस्तू, हॅण्डबॅग्ज्, नॅपकीन बुके, चांदीच्या मूर्तीसाठीचे दागिने, सिल्क थ्रेड ज्वेलरी, सावंतवाडीची लाकडी खेळणी, आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने, ड्रेस मटेरियल, कोकण मेवा, इन्स्टंट पीठ आदी वस्तूंची विक्री सवलतीच्या दरात करण्यात आली. उल्लेखनीय बाब म्हणजे, मूकबधीर व आदिवासी महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचीदेखील यावेळी विक्री करण्यात आली. नागरिकांचा या मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला.