अॅड. लक्ष्मण रानवडे यांनी केले आयोजन
पिंपरी : धार्मिक व सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याची ताकद महिलांच्या सामुहिक नेतृत्वात असून त्यास प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी केले. श्री जगद्गुरु प्रतिष्ठानच्या वतीने कर्तृत्वान महीलांचा व उत्कृष्ट महीला बचतगटांचा सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
स्वरांजली बचत गटाचा सत्कार!
संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका सुलक्षणा धर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. लक्ष्मण रानवडे, अॅड. सुनिता रानवडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी एच. ए. कॉलनीतील स्वरांजली महिला बचत गट, छाया सिनलकर, रंजना मुळिक, सुरेखा कामठे, संस्कृती महिला बचत गट वनमाला वाघमारे यांना जिजाऊ सावित्री उत्कृष्ठ कार्य पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात आले. तर सायुजता पांडुरंग दोडके यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे!
बहल पुढे म्हणाल्या की, आता महिला प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणे उभ्या आहेत. स्वतःची वेगळी ओळख त्या निर्माण करीत आहेत. अशा महिलांना सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. गेली एकवीस वर्षे महिलांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अॅड. रानवे हे पुरस्कार देत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या समाजरुपी कार्याची दखल राज्यशासनानेही नुकतीच घेतली अअसल्याचे त्यांनी नमूद केले