महिला बचत गटांतर्फे मकर संक्रांतीनिमित्त कार्यक्रम

0

निजामपूर । खुडाणे येथे महिला बचत गटांकडून तिळ गुळ घ्या गोळ- गोळ बोला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लुपिन ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फौंडेशन व देश बंधु व मंजु गुप्ता फाऊंडेशन यांच्याअंर्तगत 4 वर्षे पासुन विविध क्षेत्रात गावात काम चालु आहे. गावात सुमारे 11 बचत गट स्थापन करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे. लुपिन फौंडेशन व देश बंधुचे तालुका समनव्यक माऊची सर,प्रवीण मोरे यांनी मार्गदर्शन केले.

मदतीचे आश्‍वासन
तसेच पराग माळी यांनी उद्योग उभारणीसाठी ग्रा.प. जागा उपलब्ध करून देऊ व उत्पादन बचत गटानी करावे व निर्यातची व्रवस्था आम्ही करून देऊ. परंतु, महिलांनी यासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे. देश बंधु व ग्रा.प. यांच्या संयुक्तपणे गावात जल,शिक्षण,उद्योग, इ.स्थारावर संस्था नेहमी आमच्या गावाला मदत करतात म्हणून आभार ही मानले. कार्यक्रमाचे प्रास्तविक गुजर सर यांनी केली.