महिला बचत गटांना अनुदानाचे धनादेश वाटप

0

शिरपूर। शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून महिला बचत गटांना अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. राज्य नागरी उपजिविका अभियान योजनेअंतर्गत 46 महिला बचत गटांना 3.20 लक्ष रुपयांचे अनुदान तसेच 8 वस्तीस्तरसंघास प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे 4लक्ष रुपये अनुदानाचे धनादेश वाटप नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

दोन बचत गटांचा सत्कार
स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेअंतर्गत हगणदारीमुक्ती संदर्भात बचत गटांनी केलेल्या चांगल्या कामाबाबत महिलादिनाच्या कार्यक्रमानिमित्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते दोन बचत गटांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानयोजनेअंतर्गत हगणदारीमुक्तीसाठी ज्यांच्याघरी शौचालय नाही अशा नागरिकांना शासनाकडून 12 हजार रूपयांचे अनुदान दिले जात आहे. राज्य् शासनाच्या व केंद्र्शासनाच्या येणार्‍या योजनेचा पुरेपुर फायदा घेतला गेला पाहिजे. याविषयी मुख्याधिकारीनिवृत्ती नागरे व प्रशासकिय अधिकारी माधवराव पाटील यांनी याप्रसंगी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. व्यासपीठावर नगरसेविका तसेच मुख्याधिकारी निवृत्ती नागरे व प्रशासकिय अधिकारी माधवराव पाटील, स्वच्छ महाराष्ट्र अभियान विभागप्रमुख अभिजित मोहिते, राज्यनागरी उपजिविका अभियान विभागप्रमुख, भगवान शंकर भामरे, समुदाय संघटक प्रमोद अहिरे व शहरातील बचतगटातील महिला उपस्थित होत्या.