महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वाटप

0

नवापुर । नगरपालिका दिनदयाल अंन्तोदय योजन राष्ट्रीय नागरी उपजीवीका अभियांन अंतर्गत 10 महिला बचत गटांना 10 हजार रुपये प्रत्येक गटाला 10 हजारांचा फिरता निधी वाटपाचा कार्यक्रम नराध्याक्षा रेणुका गावीत यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी मंचावर न.पा. गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, अजय पाटील, चंद्रकांत नगराळे, शिरीष प्रजापत,आशिष मावची, सुशिला अहिरे, रिना पाटील, अनिता मावची, मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचा प्रस्तावनेत प्रकल्प अधिकारी प्रशांत भट म्हणाले की, नवापुर शहरात एकुण 110 महिला बचत गट आहेत. बचत गटाचे निरनिराळे बचत गट यांचा चांगला व्यवसाय सुरु आहे. याअभियांना अंतर्गत वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येतात यामध्ये महिलांचा सर्वागीण विकास करण्याचे काम नगरपालिका करीत आहे. महिलांना यामाध्यमातुन रोजगार मिळुन ते चांगले काम करत आहे.

चांगला उद्योग निवडण्याची आवश्यकता
मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे म्हणाले की, महिलांनी एक चांगला उद्योग निवडला पाहीजे. वेगवेळे साहित्य बनविणे व अन्य व्यवसायात प्रगती करावी. तसेच शहराची ओळख समजुन व्यवसाय करा. निधीचा चांगला उपयोग करा व त्याचे सोने करा. बॅकेची कर्जाची परत फेड नियमीत करावी जेणे करुन तुम्हाला व्यवस्यात अडचण येणार नाही. यांची काळजी घ्या असे सांगितले. यशस्वीतेसाठी मिनाक्षी भट, दानीयल मावची यांनी परीश्रम घेतले. या महिला बचत गटांना देण्यात आलेला फिरता निधी मेराली याहा बचतगट करंजीओवारा, पुष्पवन महिला बचत गट नेहरुनगर, हाजीअली महिला बचत गट, अस्मिता महिला बचत गट, दिपीका महिला बचतगट, वर्षा महिला बचत गट, कुंकुबा महिला बचत गट, बेलदार महिला बचतगट, मदीना महिला बचतगट, एकलक्ष महिला बचतगट यांना देण्यात आला.