महिला बचत गटांना मार्केटिंगसाठी ‘वेब पेज’चे व्यासपीठ

0

जळगाव जनता सहकारी बँकेचा वर्धापनदिन कार्यक्रम उत्साहात

जळगाव: जळगाव जनता सहकारी बँकेचा वर्धापनदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बँकेच्या बचत गटांच्या महितीचा समावेश असलेल्या वेब पेजचे उद्घाटन मरिआई महिला बचत गटाच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) डी. डी. एम. श्रीकांत झांबरे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, बँकेचे संचालक सतीश मदाने, कृष्णा कामठे, संचालिका डॉ. आरती हुजूरबाजार, सावित्री सोळुंखे, माजी संचालिका शोभाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील उपस्थित होते.

आज घरी बनवलेल्या वस्तू मिळणे दुर्मीळ झाले आहे. अशा वस्तू जर महिलांनी बनवून विकल्या, तर त्यात त्यांना वाव आहे मात्र, मार्केटिंग योग्य पद्धतीने झाले पाहिजे. हे ओळखून महिला बचत गटांची विस्तृत माहिती वेब पेजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे महिला बचत गटांच्या विविध कार्याची व उत्पादनांची माहिती सहज उपलब्ध होऊन बचत गटांना चांगली बाजारपेठ उपलब होणार आहे. राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) डी. डी. एम. श्रीकांत झांबरे यांनी महिला बचत गटांच्या कामामुळे महिलांची प्रगती होत असून, अशीच चिकाटी व जिद्द महिलांनी कायम ठेवावी असे आवाहन केले. नाबार्डतर्फे पुरविण्यात येणार्‍या सर्व सुविधा देण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

100 कोटींचे कर्जवाटप, थकबाकी शून्य
जळगाव जनता सहकारी बँकेत सन 2003 पासून बचत गटांच्या कामास सुरुवात झाली. आज बँकेचे 3800 बचत गट असून, बचतगटांना सुमारे 100 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बचत गटांची थकबाकी शून्य आहे. बचत गटांची बँकेतील बचत सुमारे 20 कोटी रुपये इतकी आहे. बँक बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी विविध बाजारपेठांचे आयोजन करीत असते. नागरिकानी बँकेच्या महिला बचत गटाच्या वेब पेज ुुु.क्षक्षीलश्रीहस.लेा ला भेट द्यावी, असे आवाहन जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.प्रास्ताविक बचत गट विभाग प्रमुख प्रियंका झोपे यांनी केले आहे.