महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूलच्या मुख्याध्यापकपदी संदानशिव

0

चोपडा। येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूल या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी सेवाजेष्ठतेनुसार अरुणभाई संदानशिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरुणभाई संदानशिव हे गेल्या 22 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करीत असून फलकलेखन, फोटोग्राफी, शैक्षणिक साहित्य निर्मिती हे त्यांचे विशेष छंद आहेत. त्यांना रोटरी क्लबतर्फे ’नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.

डिजीटल स्कूल, स्मार्ट क्लाससह गुणवत्तावाढीच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्रा.अरुणभाई गुजराथी, अध्यक्षा पुनमबेन गुजराथी, सचिव उर्मिलाबेन गुजराथी आदी सदस्यांनी
अभिनंदन केले.