धुळे । जा गतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील पात्र महिला मतदारांनी महिला मतदार नोंदणी मोहिमेत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी म्हटले आहे, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन आहे. महिलांचे मनोधैर्य आणि स्त्रीत्वाच्या सन्मानाचा दिवस होय. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राज्यात महिला मतदार नोंदणीसाठी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील जनगणनेनुसार असलेले 946 स्त्री- पुरुष प्रमाण आणि मतदार यादीनुसार 931 असलेले स्त्री- पुरुष प्रमाण यातील तफावत दूर करण्यासाठी महिला मतदार नोंदणी वाढविणे आणि महिला मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करणे आणि महिलांची मतदार नोंदणी वाढविणे यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे नियोजन करण्यात आले आहे.
शस्त्र परवानाधारकांनी यूआयएन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा
केंद्र शासनाच्या 15 जुलै 2016 च्या अधिसूचनेन्वये शस्त्र नियम 2016 लागू करण्यात आले आहेत. त्यातील नियम 11 नुसार प्रत्येक नवीन शस्त्र परवानाधारकांना 31 मार्च 2017 पर्यंत युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (णखछ) प्राप्त करुन घेण्यासाठी नॅशनल डाटाबेस आर्म्स लायसन्स या ऑनलाइन संगणक प्रणालीवर माहिती भरणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी कळविले आहे.
12000 नवीन मतदार नोंदणीचे उद्दिष्ट
जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिलांच्या विकासासाठी कार्यरत संस्था आणि विविध अशासकीय सामाजिक संस्थांनी आपल्या घरातील, संस्थेतील ज्या महिलेचे नाव मतदार यादीत नोंदलेले नाही, अशा महिलांचे नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेले अर्ज क्रमांक 6 तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत पुरेसे व विनामूल्य उपलब्ध आहेत. 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पूर्ण आहे, अशा महिलांना मतदार नोंदणी लगेच करता येईल. विहित नमुना क्रमांक 6 सोबत वयाचा पुरावा (जसे शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, वाहन परवाना इ.) व रहिवास पुरावा (झेरॉक्स प्रत व 2 फोटो आवश्यक आहेत. जिल्ह्याने किमान 12000 नवीन महिला मतदार नोंदणीचे उद्दिष्ट निर्धारीत केले आहे. जिल्ह्यातील युवती आणि महिला वृंद यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी केले आहे.
शस्त्र परवानाधारकांचेच परवाने नूतनीकरण
जिल्हादंडाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी म्हटले आहे, या प्रणालीवर ज्या शस्त्र परवानाधारकांची नोंद राहील तेच परवाने विधीग्राह्य राहतील व नोंद नसणार्या शस्त्रांचे परवाने रद्द ठरविण्यात येतील. 1 एप्रिल 2017 पासून या प्रणालीनुसार युनिक आयडेंटिफिकेशन (णखछ) क्रमांक प्राप्त असलेल्या शस्त्र परवानाधारकांचेच परवाने नूतनीकरण, शस्त्र खरेदी- विक्री, पत्ता बदल व इतर तदनुषांगिक बाबींचे काम आर्म लायसन्स इन्शुरन्स सिस्टिम प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांनी अद्यापपर्यंत क्रमांक प्राप्त केलेला नाही, अशा शस्त्र परवानाधारकांनी 20 मार्च पर्यंत गृह शाखेत आवश्यक त्या माहितीसह तत्काळ संपर्क साधावा.