महिला मार्गदर्शन कक्षात समस्यांचे होणार निराकरण

0

जळगाव । महिला, युवती शिक्षण घेतात, परंतु स्पर्धा परीक्षा, रोजगार इत्यादीबाबत त्यांना फारशी माहिती नसते. याबाबी लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून महिला मार्गदर्शन कक्ष कार्यान्वित आणण्याच्या संकल्पनेचा महिला दिनाच्या दिवशी शुभारंभ करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांनी बुधवारी दिली. आज बुधवारी या कक्षाचे उदघाटन डॉ. सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले. महिला, युवतींच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक महिला पोलीस अधिकारी व चार ते पाच महिला कर्मचारी सकाळी 11 ते सायंकाळी 05 वाजेदरम्यान कक्षात कामकाज पाहतील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, नोकरी करणार्‍या महिलांच्या तक्रारी व अडचणी तसेच महिला तरूणींच्या वैयक्तीक अडचणी आणि त्यातून योग्य तो मार्ग याबाबबत येथे समुपदेशन तसेच मदत करण्यात येईल.

समस्यांचे निराकरण करण्यात येईल
पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, दैंनंदिन जिवनात काम करत असताना महिलांना काही समस्या येतात. अशा समस्यांचे महिला मार्गदर्शन कक्षात निराकरण केले जाईल. अशा पध्दतीचा उपक्र्रम राज्यात पहिल्यांदाच जिल्हयात राबविला जात आहे. या केद्रातून महिलांना मदतही मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या, आज काल मार्गदर्शन खूप मिळते. पण वैयक्तीक गरज आहे. तर तशा बाबत योग्य ते मार्गदर्शन या महिला कक्षात मिळू शकेल. गरजेनुसार त्यांना येथे योग्य सल्ला मिळेल, असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलाना दिला.

यांची होती उपस्थिती
पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर ,अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी(गृह) महारू पाटील, डीवायएसपी सचिन सांगळे,प्रशिक्षणार्थी आयपीएस मनिष कलवानिया , पो.नि. राजेशसिंह चंदेल, पो.नि. जयंत सुभेदार, आरपीआय शालीक उईके, पीएसआय निता मांडवे, पीएसआय प्राची राजूरकर,पीएसआय कांचन काळे, पीएसआय सुनिता कोळपकर, सफौ सुमन कोलते, पोहेकॉ शैला एडीस, नापोका मिनल साकळीकर, वंदना अंबिकार, वैशाली पाटील, सविता परदेशी, गायत्री पाटील, अलका शिंदे,ललीत सोनवणे, पल्लवी मोरे, छाया मराठे तसेच शहरातील महिला सदस्या ज्योती चव्हाण, सरिता नेरकर,ड. मंजुळा मुंदडा, वासंती चौधरी, डॉ. महाश्वेता वैश्य, मिना सोनार, निळू इंगळे, जरीना बोहरा, मंगला सोनवणे, शोभा कुमावत, शोभाताई चौधरी, सुनिता भालेराव, निर्मला चौधरी इत्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीसाठी दिलीप येवले, चंद्र्रकांत पाटील,अशोक चौधरी, विजय पाटील, दिनेश बडगुजर, जयंत चौधरी, नरेंद्र वारूळे, संदीप साळवे यांनी परिश्रम घेतले.