महिला लोकशाहीदिनी दोन अर्ज

0

जळगाव। दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी मनपा आयुक्त जीवन सोनवणे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कुटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. व्ही. दामले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी दोन महिला तक्रारदारांनी आपले तक्रार अर्ज दाखल केले. त्यातील एक जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाशी तर दुसरा अर्ज जिल्हा अग्रणी बँकेशी संबंधित होता. हे दोन्ही अर्ज संबंधितांकडे देऊन त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी यावेळी दिले.