कर्जत। कर्मवीर हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र आणि लार्सन, टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कोतवालवाडी नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळमधील महिला मंडळ सभागृहात शुक्रवारी महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण आणि विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी नेरळ सह ग्रामीण भागातील महिलांनी आणि मुलींनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र आणि लार्सन, टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कोतवालवाडी नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळमध्ये हे महिला विकास केंद्र 2008 पासून सुरु आहे. यात महिलांना रोजगार आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेव्हापासून नेरळ सह ग्रामीण भागातील महिला याचा लाभ घेत आहेत. आणि अनेक महिलांना यापासून रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.
महिलांनी घरी आणि सभागृहात बनवलेल्या वस्तूंचा समावेश
या प्रदर्शनात महिलांनी घरी आणि सभागृहात बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, यात डेकोरेटिंग बांगड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कापडी पिशव्या, केसातील आभूषणे, बटवे, पंजाबी ड्रेस, वाल हँगिंग, बांगड्या स्टॅन्ड, गृहोपयोगी या वस्तूंची विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन नेरळच्या महिलांना प्रोत्साहन पर दाद देणारे ठरले. यावेळी महिला विकास केंद्राच्या अध्यक्षा संध्या देवस्थळे, उपाध्यक्ष सीमा गरुड, भारती सुगवेकर, शिल्पा डहाके, स्वाती शेळके, अपर्णा कर्वे, अनु पारधी, दीप्ती जोशी, योगिता, रेशमा हाबळे आदी उपस्थित होत्या.