महिला व बालकल्याण समितीची सभा उत्साहात

0

चाळीसगाव । चाळीसगाव नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती रंजनाताई यशवंतराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपालिकेत महिला व बाल कल्याण समितीची सभा शनिवारी 19 मे 2018 रोजी सकाळी उत्साहात पार पडली. याप्रसंगी रंजना सोनवणे यांच्यातर्फे शहरात महिलांसाठी स्वतंत्र महिला रूग्णालयाची निर्मिती करण्याचा ठराव शासनास नगरपालिकेच्या व महिला बाल कल्याण समितीच्या वतीने पाठवून शासनाने तो मंजूर करावा यासाठी प्रयत्न करणेचा ठराव सर्व उपस्थित सदस्यांनी बहुमताने मंजूर केला. तसेच शहरातील गरिब विद्यार्थीनी व महिलांसाठी शाळा, कॉलेजेस, हायस्कूल येथे सॅनिटरी पॅड वेंडिग मशिन बसवून पाळीच्या काळात फक्त पाच रूपयात महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे 10 पॅडचे पाकिट फक्त 5 रूपये मशिनमध्ये टाकून पॅडपाकिट मिळेल. यासाठी तसे किमान दहा ठिकाणी असे पॅड वेंडिंग मशिन बसविण्यात यावेत.असा ठराव बहुमताने मंजूर केला.

मुलांसाठी खेळणी, सिमेंट बाकडे बसविण्याचा ठराव
प्रत्येक प्रभागात किमान दहा सिमेंट बाकडे देण्यासाठीचा ठराव नगरसेविका अलका गवळी व विजया पवार (सेना), झेलाताई पाटील यांनी मांडला व त्यास बहुमताने मंजूरी दिली. प्रत्येक प्रभागात लहान मुलांना खेळणी बसविण्या बाबतचा नगरसेविका विजया पवार व वंदना चौधरी व वत्सला महाले यांच्या सुचनेनुसार ठराव बहुमताने मंजूर केला. शहरातील अंगणवाडींच्या परिसरात स्वच्छता ठेवणे, लहान बालके, कुपोषित मुले व गरोदर मातांची आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करणे इत्यादी अनेक ठराव बहुमताने मंजूर करण्यात आलेत. यावेळी विभागाचे प्रमुख दिपक देशमुख, भुषण लाटे यांनी इत्यादी विविध विषयांवर मान्यवरांच्या ठराव व सुचनांबाबत चर्चा केली. आभारप्रदर्शन नगरसेविका अलका गवळी यांनी केले.